Travelअहमदनगरमहाराष्ट्र

एकीकडे लसीकरण अन दुसरीकडे डॉक्टरची आत्महत्या ; सुसाईट नोटमध्ये कलेक्टरसह तहसीलदार व तालुका आरोग्यअधिकाऱ्यांची नावे

अहमदनगर : वेळेत पगार न देणे, कामाचा अतिरिक्त भार व पगार कपातीची धमकी देणे या कारणाला कंटाळुन मंगळवारी दुपारी करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात समुदाय वैद्यकीय अधिकारी गणेश गोवर्धन शेळके यांनी गळफास घेवुन आत्महत्या केली.
शेळके यांनी आत्महत्ये पुर्वी लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीमधे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे व तहसीलदार व कलेक्टर माझ्या आत्महत्येस कारणीभुत राहतील असे म्हटले आहे.  करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात समुदाय वैद्यकीय अधिकारी गणेश गोवर्धन शेळके एक वर्षापासुन काम करतात. मंगळवारी दवाखान्यात लसीकरणाचे काम सुरु होते. शेळके व कोणाचा तरी भ्रमणध्वनीवरुन वाद झाला. त्यानंतर आरोग्य सेविकेला तुम्ही काम करा मी दवाखान्यात थांबतो असे शेळके म्हणाले. खुप वेळ झाला तरी शेळके बाहेर आले नाहीत म्हणुन तेथील नागरीक व सरकारी कर्मचाऱ्यांनी खिडकीतुन आत पाहीले तर शेळके यांचा मृतदेह दवाखान्याच्या खोलीतील पंख्याला लटकलेला दिसला. पोलिसांना माहीती मिळाली. पोलिस अधिकारी घटनास्थळी गेले. तेथे पोलिसांनी शेळके यांनी लिहलेली चिठ्ठी सापडली.
त्यामधे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, तहसीलदार व कलेक्टर हे माझ्या आत्महत्येस जबाबदार राहतील. वेळेत पगार न देणे, कामाचा अतिरिक्त भार व पगार कपातीची धमकी देणे यामुळे मी आत्महत्या करीत आहे असा मजकुर आहे.   

Back to top button