एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. प्रकाश पवार

महासंदेश : राहुरी तालुक्यातील वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रांमध्ये कायम अग्रेसर असलेल्या शिव प्रतिष्ठान संस्थेचे सचिव डॉ प्रकाश पवार यांची महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसे फेडरेशनचे अध्यक्ष दीपक आगळे यांनी पत्रकाद्वारे घोषित केले.
सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या परंतु विखुरलेल्या अवस्थेत असणाऱ्या सर्व एनजीओ यांची मोट बांधून सर्वांना एकत्र करण्याचे काम या फेडरेशनद्वारे सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
राहुरी येथील शिव प्रतिष्ठान या एनजीओ च्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून सतत सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे डॉ प्रकाश पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमांचा बोलबाला असताना मराठी माध्यमाची महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त स्वयं अर्थसहाय्यित सेमी इंग्रजी शिवांकुर विद्यालय कोंढवड येथे तसेच खडांबे खुर्द येथील शिवसृष्टी विद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक शिक्षकांना मोठी संधी उपलब्ध करून दिली.
डॉ पवार हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने सतत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, प्रबोधनपर व्याख्यानमाला आयोजित करण्यात येतात.
शिवांकुर पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक बाजू सांभाळत असताना ग्रामीण भागातील गरजूंना लघुउद्योग करण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाते.
शिव प्रतिष्ठानशी संलग्न असलेल्या इंद्रायणी स्वयंरोजगार सहकारी संस्थेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करून प्रयत्न केले जातात.
सामाजिक कार्यात देखील अग्रेसर राहून महापुरुषांच्या जयंती, लोकोपयोगी व्याख्यान, प्रशिक्षण वर्ग आदी कार्य नेहमीच करत असतात.
शिव प्रतिष्ठान संचलित तालुकास्तरीय शिवजयंती जन्मोत्सव सोहळ्यामध्ये कायमच नवनवीन उपक्रम राबवले जातात.
कोरोना महामारी च्या काळामध्ये सामाजिक कार्यामध्ये जनजागृती करताना पोलीस बांधवांसाठी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना व वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनीटायझर्स चे वाटप करण्यात आले…
प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर सर्व स्तरांमधून डॉ प्रकाश पवार यांचे अभिनंदन करण्यात आले, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, बारामती ॲग्रो चे सुभाष गुळवे विस्ताराधिकारी विनायक गुळवे, मा. प्रशासन अधिकारी लक्ष्मणराव गुळवे, तालुक्यातील पत्रकार विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर लोकांनी विशेष अभिनंदन करून सत्कार केला.
डॉ प्रकाश पवार यांचे हे सर्व कार्य संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, मंगलताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ गौरी पवार, डॉ किशोर पवार, डॉ संदीप निमसे, डॉ शुभांगी पवार, डॉ नरेंद्र इंगळे, गणेश शेळके, युवराज पवार, किशोर शिरसाठ, नारायण निमसे, संदीप निबे, ज्योती शेळके, शिल्पा इंगळे आदी विश्वस्तांच्या सहकार्याने सुरू आहे…
कोरोना महामारी च्या काळात निराधार झालेल्या व्यक्तींसाठी लवकरच आधार देण्यासाठी सर्व सोयींयुक्त आश्रमाची व्यवस्था करण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला.
शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढेही असेच नवनवे उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस असल्याचे सांगत फेडरेशनच्या माध्यमातून हा आलेख कायम उंचावत ठेवू असे प्रतिपादन डॉ प्रकाश पवार यांनी केले.