
अहमदनगर: कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात काटवनात सोमवारी गोवंश कत्तलीसाठी आणलेल्या २० जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात खडक वसाहत काटवनात छापा टाकला. यावेळी गोवंश जातीची २० जनावरे कत्तल करण्यासाठी लपवून व बांधून ठेवलेली मिळुन आली. पोलिसांनी २ लाख ३६ हजार किंमतीच्या देशी, जर्सी गायी, वासरे, गोऱ्हे अशी गोवंश जातीची २० जनावरे ताब्यात घेऊन गोकुळधाम गोशाळा, कोकमठाण येथे पाठवून दिली. याप्रकरणी आरोपी सिकंदर शेख व अक्रम फकीर कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.