अहमदनगर

करोनात समशान भूमी मध्ये कार्य करणाऱ्या योद्धांचा मनसे च्या वतीने सन्मान

महासंदेश : करोना काळात समशान भूमी व कब्रस्तान येथे कार्य करणाऱ्या योद्धांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भेटवस्तू देऊन करोना योद्धे म्हणून सन्मान करण्यात आला.

हा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त सुनील कुरे, साहेबान जाहागीरदार, सिद्धार्थ आढाव यांच्यासमवेत काम करणाऱ्या युवकांचा सत्कार करताना जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, शहरअध्यक्ष गजेंद्र राशिनकर, अनिता दिघे, परेश पुरोहित, विनोद काकडे, दीपक दांगट, गणेश शिंदे, संकेत व्यवहारे, संकेत होसिंग, संतोष साळवे, मनोज राउत, अभिनय गायकवाड, पोपट पाथरे, रतन गाडळकर, अशोक दातरंगे, अंबादास गोटीपामुल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

करोनाच्या संकट काळामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक कार्य केले अशा योद्धांचा सन्मान करण्यात आला. करोना पॉझिटिव पेशंटला मृत्युनंतर नातेवाईक त्यांच्या जवळ जात नव्हते व त्यांना हातदेखील लावत नव्हते, अशा काळात या सर्वांनी सामाजिक भावनेतून आपले कर्तव्य पार पाडले व अहोरात्र अमरधाम असो किंवा कब्रस्तान असो या ठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य चोख पद्धतीने पार पाडले. त्यामुळे अशा योद्धाचा सन्मान करण्यात आला.

Back to top button