अहमदनगर

करोना चे संकट कायम; महापालिका झाली सतर्क

अहमदनगर : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा निर्बंध स्तर एकमध्ये येत असल्याने शहरातील सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले आहेत. मात्र करोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसून प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासन सतर्क राहणार असून खबरदारीच्या उपाय योजना करणार असल्याचे, महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले.

शहरात करोना बाधितांची संख्या नियंत्रणात आली, त्याबद्दल येथील स्व. रामलालजी ललवाणी मेमोरियल फौंडेशनच्यावतीने महानगरपालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी आयुक्त गोरे बोलत होते. नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब पवार, उद्योजक योगेश पवार, शेखर देशपांडे, राजू लयचेट्टी, किशोर कानडे, गणेश भंडारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या नियमांची शहरात प्रभावी अंमलबजावणी झाली. यासाठी महानगरपालिका प्रशासनातील सर्व घटकांनी परिश्रम घेतले, त्यामुळे सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतुन महापालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त गोरे व महापौर वाकळे यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे यावेळी स्व रामलालजी ललवाणी मेमोरियल फौंडेशनचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी सांगीतले.

Back to top button