अहमदनगर

कर्जत-कुळधरण येथे माती परिक्षण कार्यशाळा

अहमदनगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयातील कृषीदुत विनय सुपेकर याने ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगीक संलग्नता या कार्यक्रमांतर्गत अभ्यास दौऱ्यात कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे माती परिक्षण प्रात्यक्षिक दाखवत शेतकयांना मार्गदर्शन केले.

     कृषीदुत विनय सुपेकर याने शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे फायदे, मातीत आढळणारे विविध पोषक घटक व त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कसे अबाधित ठेवता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले. सध्याचा मृदेचा होणारा ऱ्हास व माती परिक्षण शिबिरांची खेडोपाडी असणारी आवश्यकता यावरही त्याने सूतोवाच केले. माती परीक्षण कसे आणि का करावे? याचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकयांनी विशेष सहभाग नोंदवीत सुपेकर यांचे अभिनंदन करीत कौतुक केले. विनय सुपेकर यांना क. का. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सतिष हाडोळे,  प्रा. परमेश्वरी पवार  व प्रा. सुनील बैरागी  यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button