अहमदनगर

कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

अहमदनगर – तरूणाने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रसाद रघुनाथ साबळे (वय 32 रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.
तो तीन दिवसांपासून घरातून निघून गेला होता. त्याच्या घरच्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मिसिंगची नोंद करण्यात आली होती. दरम्यान रविवारी त्याचा मृतदेह अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे शेतातील विहिरीत आढळून आला.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रसादचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केला होता. प्रसादने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय त्याच्या चुलत भावाने पोलिसांसमोर व्यक्त केला आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Back to top button