Travelअहमदनगरमहाराष्ट्र

काम करण्याला कधी-कधी आणि श्रेय घ्यायला सगळ्यात आधी ; आमदार गोपीचंद पडळकर यांची ‘या’आमदारावर टीका

अहमदनगर :  आ.रोहित पवार हे पोस्टरबॉय आहेत. ते केवळ सोशल मीडियावर सक्रिय असतात. मतदारसंघातील रस्ते खराब आहे तिकडे लक्ष द्यावे. माजी मंत्री राम शिंदे यांनी मंजूर केलेले कामेच अद्याप चालू असून त्यांच्या कामाचे श्रेय ते घेत आहे. काम करायला कधी कधी आणि श्रेय घ्यायला सर्वात आधी अशी त्यांची परिस्थिती आहे.अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. आमदार पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे दर्शन घतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी  ते म्हणाले, आमदार झाल्यापासून रोहित पवार यांना आपण स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत बारामती ॲग्रोच्या माध्यमातून निकृष्ट खाद्य कोंबडी पालकांना दिले.  त्यामुळे कोंबडी अंडे देत नाही म्हणजे पवारांनी कोठेही पेरले तर तिथे घोटाळा उगवणार हे बारामती अँग्रो मुळे सिध्द झाले आहे. या सरकारमधील मंत्री त्यांचे खाते सोडून इतरांच्या खात्यावर बोलतात गृहमंत्र्यांचा विषय असेल तर कामगार मंत्री बोलतात, शिक्षणमंत्र्यांच्या विषयावर ग्रामविकासमंत्री बोलतात त्यामुळे यांच्यात ताळमेळ राहीला नाही. यांना जनतेचे घेणेदेणे राहिले नाही. निर्णय कोणी जाहीर केला की थोड्यावेळाने कोणीतरी म्हणतेय आम्ही तसा निर्णय घेतला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण काय करतेय काहीच कळत नाही अशी टीका आ.पडळकर यांनी केली.   

Back to top button