अहमदनगर

काय म्हणावे या चोरट्यांना ; चक्क दानपेटीसह भजनाचे साहित्य चोरले!

अहमदनगर : अलीकडे चोरटे कशाची चोरी करतील ते सांगता येणार नाही. नुकतीच अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीसह मंदिरात ठेवलेले भजनाचे साहित्य देखील लंपास केले आहे. तर काही वस्तूची तोडफोड केली आहे.
ही घटना नेवासा तालुक्यातील लोहोगाव येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, लोहगाव येथील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या मारुती मंदिर,विठ्ठल रुख्मिनी मंदिर,संत तुकोबाराय मंदिर,भारती बाबा समाधी परिसरातील दानपेटी फोडून सदर दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली. तसेच भजनी मंडळ साहित्य ठेवण्याच्या ठिकाणची खोलीचेही कुलूप तोडून त्रिशूळ घालून साउंड सिस्टिमचे नुकसान करत २ कॉडलेस माइक चोरट्यांनी लांबिवले. सायंकाळी हरिपाठ करण्यासाठी आलेल्या भजनी मंडळीच्या व दिवा बत्ती करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली.
यापूर्वीही लोहोगाव येथील मंदिर परिसरात यापूर्वीही चोऱ्या झाल्या होत्या गेल्या आठवड्यात मंदिर परिसरातील गोडावूनही फोडण्यात आले होते.पण आता चोरट्यांनी मंदीरात चोरी केली आहे
दोन दिवसापुर्वी पानेगाव मध्ये शिक्षकाचे बंद घरामध्ये झालेल्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच आता लोहगाव मधील मंदीराचे दानपात्र फोडल्यामुळे पोलिसासमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे.

Back to top button