देश-विदेशमहाराष्ट्र

काय सांगता : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बेरोजगारी १२ टक्क्यांवर !

महासंदेश : कोरोनाने देशात हाहाकार माजावला असून कोरोनाच्या  पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट खूप भयंकर निघाली आहे. कारण या दुसर्‍या लाटेत  लाखो लोकांचे प्राण गेले असून जवळपास एक कोटी लोकांच्या नोकर्‍या गेल्या तर अनेकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

एका संस्थेने सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार आतापर्यंत ९७ टक्के कुटुंबीयांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर ८ टक्के इतका होता. तो वाढून १२ टक्क्यांपर्यंत गेला आहे. म्हणजेच जवळपास  १ कोटी नागरिकांनी  या महामारीत आपली नोकरी गमावली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे  ज्यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, त्यांना दुसरी नोकरी मिळणेही कठीण झाले आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे बेरोजगारी दर २३.५ टक्क्यांवर पोहोचला होता. बेरोजगारी वेगाने वाढत आहे त्यानुसार ही परिस्थिती सुधारण्यास खूप वेळ लागण्याची शक्यता आहे.

संस्थेने गेल्या महिन्यात १ लाख ७५ हजार कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले. केवळ ३ टक्के कुटुंबीयांचे उत्पन्न वाढल्याचे या सर्वेक्षणात आढळले. तर ५५ टक्के कुटुंबीयांनी उत्पन्न घटल्याचे सांगितले, तर ४२ टक्के कुटुंबीयांनी आपले उत्पन्न आहे तेवढेच असल्याचे सांगितले.

Back to top button