अहमदनगर

कोणाच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

महासंदेश : चक्क एका तरुणाने छळाला कंटाळून
विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना राहाता तालुक्यात घडली आहे.

अलीकडे विविध प्रकारच्या कारणास्तव अनेकानी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात तरुणांचा देखील समावेश आहे. नुकतीच एका तरुणाने आपला छळ केला जात असून या छळाला आपण कंटाळून आत्महत्या करत असल्याची सोशल मीडियावर पोस्ट टाकली व विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.ही घटना अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील जवळके या गावातील सुजित बाळासाहेब चौधरी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सुजित याने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट मध्ये एकजण आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहे. माझा त्यांच्या माणसाद्वारे छळ करत आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. अशी पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Back to top button