महाराष्ट्र

कोयना धरणातून आज सोडणार पाणी ; नदीकाठी सावधानतेचा इशारा

महासंदेश : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस वाढतच असून त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे सकाळी आठ वाजताच उघडून १० हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तर दहा वाजता २५ हजार क्युसेक पाणी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने धरणात खूप मोठ्या प्रमाणात आवक होत असलेने दि. 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वाजता धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. तसेच सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 25000 क्युसेक्स इतका करणेत येणार आहे. या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन कोयना धरण व्यवस्थापने केले आहे.

Back to top button