महाराष्ट्र

कोरड्या विहिरीत ट्रॅक्टर कोसळून तरुणाचा मृत्यू !

महासंदेश : शेतात ट्रॅक्टरने मशागतीचे काम करीत असताना कोरड्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने चालक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना नांदेड जिल्ह्यात घडली. शिवराज भगवान कापसे असे, मृत तरुणाचे नाव आहे. तो आई वडिलांना तो एकुलता एक होता. कुटुंबाचा कमावता आधार गेल्यामुळे कापसे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 याबाबत सविस्तर असे कि, शिवराज  कापसे दि. १५ जून रोजी तो आपला ट्रॅक्टर क्र.एमएच २६ बीक्यू १४०४ घेऊन शेतात नांगरणीचे काम करण्यासाठी गेला होता. शेतात नांगरणी करीत असताना शेताजवळ असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत पडला आणि शिवराज कापसे हा गंभीर जखमी झाला व त्याच्यासोबत असलेला आणखी एक तरुण  देखील गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टर विहिरीत पडलेला आवाज ऐकुन जवळ असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा करुन गावातील ग्रामस्थांना बोलावून घेतले आणि दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नांदेडमधील खासगी रुग्णालयात नेले असता शिवराज कापसेला शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला. त्यामुळे उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शिवराज कापसे यास उपचारादरम्यान मृत घोषित केले. मयत शिवराज कापसे याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, २ लहान मुले असा परिवार आहे. आई वडिलांना तो एकुलता एक होता. कुटुंबाचा कमावता आधार गेल्यामुळे कापसे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Back to top button