Travelमहाराष्ट्र

कोल्हापूरच्या अस्मितेस कोणीही डिवचण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना खपवून घेणार नाही : राजेश क्षीरसागर

कोल्हापूरच्या प्रवेशद्वारास राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नांव

 महासंदेश : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचा अभिमान आहेत. त्यांच्या विचाराने आजपर्यंत आम्ही शिवसैनिक काम करत आलो आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपला स्वाभिमान अखंड जगाला दाखविला असताना, कोणी उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर जाहिरातीचा फलक लावत असेल, तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नांवाचा फलक आज लावण्यात आला.

  गेले दोन दिवसापासून कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर एका उद्योगपतीच्या नावाचा फलक झळकत होता. याबाबत समस्त कोल्हापूर वासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूरचा स्वाभिमान आणि अस्मिता दाखवून देण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करीत नावाचा फलक लावण्यात आला. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या” विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

Back to top button