महाराष्ट्र
कौटुंबिक न्यायालयात १०० जणांचे लसीकरण

महासंदेश : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात शनिवारी पुणे महापालिकेच्या पुढाकारातून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली. लसीकरण मोहिमेत कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश, वकील तसेच कर्मचारी वर्ग अशा शंभरजणांचे लसीकरण करण्यात आले. कौटुंबिक न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे यांनी लसीकरण मोहिमेसाठी प्रयत्न केले होते. महापालिकेच्या सहकार्याने शनिवारी लसीकरण मोहिम राबविण्यात आली. लसीकरण मोहिमेत शंभरजणांना लस देण्यात आली. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश मनीषा काळे, वकील संघटनेच्या उपाध्यक्ष प्रगती पाटील, वकील तसेच कर्मचारी वर्ग आदी याप्रसंगी उपस्थित होते.