अहमदनगर

खुलेआम बायोडिझेल विकणार्‍या तस्करांवर नगर ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा

अहमदनगर – रस्त्याच्या बाजुला खुलेआम बायोडिझेल विकणार्‍या तस्करांवर नगर ग्रामीण पोलीस विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.

नगर-सोलापूर रोडवरील वाटेफळ परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बायोडिझेल, रोख रक्कम, टँकर, ट्रक, कार असा एक कोटी 75 लाख 40 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 11 जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

अविनाश पोपटराव नाटक, मुजमील राजु पठाण (रा. केडगाव), बंडू बाळासाहेब जगदाळे, चंद्रकांत शेखर सोनोणे (सर्व रा. रूईछत्तशी ता. नगर), विजय अशोक वाडेकर (रा. कोठला, नगर), योगेश भगवान गंगेकर, अस्लम मुबारक सय्यद (रा. वाटेफळ), सचिन दशरथ लामखडे (रा. कातळवेढा ता. पारनेर), वाहन चालक अरूण माधयन, वेडीआप्पा गंगा दुरई (दोघे रा. तमिळनाडू), बाबासाहेब सखाराम बोरकर (रा. भोयरेपठार ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

नगर-सोलापूर रस्त्यावर अवैधरित्या बायोडिझेल विकले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी दोन टँकरमधून वाहनांमध्ये बायेडिझेल भरले जात होते. पोलीस पाहताच पळापळ सुरू झाली. पथकाने 11 आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली. यावेळी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनाही बोलविण्यात आले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कटके यांच्या पथकातील सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार नाणेकर, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, विष्णू घोडेचोर, दिनेश मोरे, भाऊसाहेब काळे, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, संदीप दरंदले, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संतोष लोंढे, सचिन अडबल, मच्छिंद्र बर्डेे, योगेश सातपुते, रोहित येमूल, सागर ससाणे, मयुर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, रवींद्र घुंगासे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी करीत आहे.

Back to top button