गर्दी आवरा अन्यथा लॉकडाऊन…! ‘या’ पालकमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

महासंदेेेश:
तौक्ते वादळाने किनारपट्टीवरील भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकतेच रायगड जिल्ह्यातील बाजारपेठेत पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात भेट देवून पाहणी केली. मात्र यावेळी बाजारात झालेली गर्दी पाहून त्या चांगल्याच संतापल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत ही गर्दी आवरा अन्यथा कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला.
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत चालला आहे. मात्र तरीदेखील अद्याप काही भागात कोरोनाचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पूर्णपणे गेला आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे अद्यापही राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. परंतु तौत्के चक्रीवादळानंतर रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन काही प्रमाणत शिथिल करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊन शिथिलता करण्याचा अर्थ नागरिकांनी लॉकडाऊन संपला असा घेतला आहे. म्हसळा शहरात देखील अशी स्थिती निर्माण झाली असून, म्हसळा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री यांनी बाजारपेठेतील गर्दी पाहून थेट कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
![]() | उत्तर द्याफॉरवर्ड करा |