Travelअहमदनगरमहाराष्ट्र

गर्भगिरीच्या डोंगर रांगेत हजारो वृक्षांची सरपणासाठी कत्तल ; वन विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने निसर्गप्रेमी संतापले

 महासंदेश : पाथर्डी तालुक्याला वरदान लाभलेल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगेत सरपणासाठी हजारो वृक्षांची कत्तल होत आहे. दिवसाढवळ्या वृक्षतोड होत असताना वन विभागाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. निसर्गासाठी रक्षक असलेला वन विभाग भक्षक बांधल्याने निसर्गप्रेमी संतापले असून दोषीवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळ , लायन्स क्लब , दोस्ती तरुण मंडळासह  अनेक निसर्गप्रेमी निसर्ग संवर्धनासाठी अथक परिश्रम करत आहेत. वृक्षप्रेमींनी उन्हाळ्यात ड्रमणे व बाटल्यांनी पाणी घालून डोंगरातील अनेक झाडे जगवली आहेत. दुसरीकडे मात्र वनविभागाच्या आशीर्वादाने भरमसाठ वृक्षतोड होत आहे.केळवंडी, चेकेवाडी या परिसरातील डोंगर पायथ्याला लिंब, बाभूळ ,जांभूळ, दाबुर्डा, हेकळ, सिताफळ, खैर, भोकर, करवंद यासह विविध वनौषधींच्या वृक्षांची  मोठ्या प्रमाणात तोड करून मोठमोठ्या सरपणाच्या गंजी लावल्या आहेत. या परिसरात दुधापासून खवा मोठ्या प्रमाणात बनवला जातो. खवा बनवण्यासाठी लाकडाच्या  इंधनाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.  वन विभागा च्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी आर्थिक देवाण-घेवाण करून  डोंगरात  प्रमाणात वृक्षतोड होत आहे. प्रचंड वृक्षतोडीमुळे विविध वनौषधीमुळे सोन्याचा डोंगर म्हणून ओळख असलेला परिसर अक्षरशा बोडखा केला आहे.श्री क्षेत्र वृध्देश्वर ,श्री क्षेत्र मढी, श्री क्षेत्र मायंबा, श्री क्षेत्र मोहटादेवी देवी,  आदी जागृत देवस्थाना बरोबर निसर्गरम्य डोंगर परिसरामुळे पाथर्डी तालुका पर्यटकांना खुणावत होता. वृक्षतोडीमुळे डोंगर परिसर वोसाड होऊ लागल्याने त्याचा पर्यटनावर परिणाम होणार आहे. वृक्षतोड इकडे वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने निसर्गप्रेमी मध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषीवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलनाची तयारी सुरू आहे. 

चौकट:

वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना डोंगर परिसरात होणारी वनौषधींची वृक्षतोड निसर्गप्रेमींसाठी क्लेशदायक व दुःखद घटना आहे. वन विभागाने दोषींवर कारवाई करून झाडे तोडणाऱ्यांवर वचक निर्माण करावा. वनविभागाने लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा निसर्गप्रेमींची बैठक घेऊन वन विभागाच्या विरोधात ठोस भूमिका घेऊराजेश काळे, खजिनदार लायन्स क्लब

चौकट : एक झाड मोठे व्हायला खूप वेळ व कष्ट घ्यावे लागतात. गर्भगिरीच्या डोंगरांगात वन विभागाच्या आशीर्वादाने हजारो वृक्षांची कत्तल झाली आहे. हा प्रकार गंभीर असून राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांनी विशेष लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कठोर कारवाईसाठी आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे.= रणजीत बेळगे, निसर्गप्रेमी

चौकट:

गेल्या सहा-सात वर्षांपासून आम्ही वनदेव परिसरात वृक्षारोपण करत आहोत वन विभागाचा कुठलाच अधिकारी झाड लावताना किंवा सांभाळ करताना दिसला नाही. वनविभाग निसर्गाचा काळ बनला आहे.चेकेवाडी केळवंडी परिसरात वन खात्याच्या आशीर्वादाने वृक्षतोड होत आहे दोषींवर कारवाई साठी आपण आमरण उपोषण करणार आहोत.= मुकुंद लोहिया, निसर्गप्रेमी तथा सचिव सुवर्णयुग तरुण मंडळ 

Back to top button