अहमदनगर

गावरान मेवा लघुपटातील कलाकारांनी सुरू केलेल्या उद्योगास नगरकर भरभरून प्रतिसाद देतील : आ.संग्राम जगताप

यार्ड येथे “गावरान मेवा मिसाळ” या दालनाचा शुभारंभ

अहमदनगर – करोना संसर्ग आजारामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये विविध व्यवसाय बंद पडली आहे. यामुळे युवकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आजच्या युवकाला शासकीय नोकरीसाठी वन-वन करावे लागते तरी युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आपल्या आवडत्या व्यवसायाकडे वळावे. ध्येय निश्चित करून जिद्द व चिकाटीच्या बळावर आपला व्यवसाय यशाच्या शिखराकडे घेऊन जावे. मार्केट यार्ड येथे नव्याने सुरू झालेल्या गावरान मेवा मिसळ नगरकरांच्या पसंतीस नक्कीच उतरेल कारण जगप्रसिद्ध गावरान मेवा लघुपटातील कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली.गावरान मेवा लघुपटातील सरपंच किरण बेरड यांनी सुरू केलेल्या गावरान मेवा मिसळ खवय्यांना नक्कीच आवडेल असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.


मार्केटयार्ड येथे नगर तालुक्यातील मेहकर येथील सुप्रसिद्ध गावरान मेवा मिसळ या शाखेचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आ.अरुणकाका जगताप,महापौर रोहिणी ताई शेंडगे,उपमहापौर गणेश भोसले,नगरसेवक प्रकाश भागानगरे,मा.नगरसेवक संजय चोपडा, गावरान मेवा मिसळचे संस्थापक किरण बेरड,संचालक नितीन दळवी,पत्रकर विठ्ठल लांडगे, शरद झोडगे,प्रकाश फुलारी,राहुल पानसरे,राम पानमळकर,एम.आर.कोलते, दिलीप पवार, धनराज शेवाळे,अशोक निमसे,राम आंबेकर,विपुल शेट्टीया,विजय पुंड,संजय पुंड,अण्णा चौधरी, अविनाश जाधव,लहू चोभे, नामदेव गव्हाणे, महेश काळे, संजय पंडित, वैभव कुऱ्हाडे,तेजस आंधळे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


यावेळी बोलताना किरण बेरड म्हणाले की,आजकालच्या युगात केमिकल युक्त खाद्य पदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे.अनेकांना आजारपणामुळे आपल्या आवडीचे पदार्थ खाण्यास निर्बंध आहे हीच बाब ओळखून गावाकडील घरगुती मसालाने तयार केलेली गावरान मेवा मिसळ नगर मधील खवय्या प्रेमींसाठी आम्ही घेऊन आलो आहेत.ही मिसळ खाल्ल्याने कुठल्याही प्रकारची ऍसिडिटी,पित्त नागरिकांना जाणवणार नाही अशा प्रकारची ही मिसळ आहे असे ते म्हणाले.

Back to top button