गावाने पुन्हा विकास कामे करण्याची संधी दिली : जालिंदर कदम

गावाने पुन्हा विकास कामे करण्याची संधी दिली : जालिंदर कदम
मांजरसुंब्यात क्रांतिविकास पॅनलचा 6 जागांवर विजय तर महाविकास आघाडीला मिळाली एक जागा
नगर, दि.8 (प्रतिनिधी) – गेल्या वीस वर्षात गावात राजकारन न करता समाजकारण केले. त्यामुळे गावात विकासकामे करण्यासाठी जनतेने पुन्हा क्रांतिविकास पॅनेलला बहुमताने विजयी करून, पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे मनस्वी आभार मानून गट-तट विसरून गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार, असल्याचे जालिंदर कदम यांनी सांगितले.
नगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी तीन ग्रापंचायती बिनविरोध झाल्या होत्या. 56 ग्रापंचायतींसाठी 15 रोजी मतदान झाले. तालुक्यात सरासरी 81 टक्के मतदान झाले होते. ग्रापंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी लागला.
मांजरसुंबा येथे महाविकास आघाडी विरुद्ध क्रांतिविकास पॅनेल अशी दुरंगी लढत झाली. या लढतीत महाविकास आघाडीला एकच जागा मिळाली असून, जालिंदर कदम यांनी सहा जागांवर विजय मिळाला.
ग्रामपंचायत निवडणुकीत जालिंदर कदम यांच्या क्रांतिविकास पॅनेलचे विजयी झालेले उमेदावार व त्यांना मिळालेली मते- जालिंदर कदम-207, रुपाली कदम- 196, प्रशांत कदम- 204, किरण कदम -157, मंगल कदम-158, कविता वाघमारे-204. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता कदम यांनी ज्ञानेश्वरी कदम यांचा 7 मतांनी पराभव केला.
निवडणुकीत ग्रामस्थांनी भरभरून मते देवून विजयी केल्याने, कदम यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले, गावाचा विकास हिच संकल्पना मनात ठेवून विकासकार्य सुरू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने विकासालाच मत देवून पुन्हा आम्हाला सत्तेत बसवेल आहे.