अहमदनगर

गोरक्षनाथ जयंती निमित्त मांजरसुंबा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन

अहमदनगर, (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ जयंती निमित्त वै. बाळकृष्ण कदम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गोरक्षनाथ महाराज ढोकणे यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

पारायण व्यासपीठ बाबासाहेब गंगाधर कदम महाराज व गोरक्षनाथ ढोकणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ६ ते ७ विष्णु सहस्त्र नाम, ८ ते ११ नवनाथ पारायण. दुपारी २ ते ४ भजन, ४ ते ५ हरिपाठ व रात्री ५ ते ११ हरि किर्तनसेवेचा कार्यक्रम होणार आहे. तरी परिसरातील भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

मंगळवार (दि.२६) रोजी कृष्णा रायकर महाराज यांची तर बुधवार (दि.२७) योगेश जाधव महाराज आळंदीकर यांची कीर्तनरुपी सेवा झाली. तर गुरुवार (दि.२८) तुळशीराम लबडे महाराज यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार (दि.२९) अमोल सातपुते महाराज, शनिवार (दि.३०) ईश्वर कदम महाराज. रविवार (दि.१) लक्ष्मण महाराज शास्त्री, सोमवार (दि.२) गोरक्षनाथ ढोकणे महाराज यांचे कीर्तन होणार आहेत. तर मंगळवार (दि.३) रोजी सकाळी ७ वाजता दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर ९ ते ११ या वेळेत जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Back to top button