अहमदनगरमहाराष्ट्र

गौतम हिरण अपहरण प्रकरण ; पाच आरोपींविरुद्ध ५०५ पानांचे दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या तसेच पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेले श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण हत्याकांड प्रकरण. यात प्रथम अपहरण करून नंतर हत्त्या करण्यात आल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते. कोणताही ठोस पुरावा नसतानाही पोलिसांनी यातील आरोपी जेरबंद केले. काल या हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

याबाबत सविस्तर असे , श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांची अज्ञाताने अपहरण केले होते. त्यामुळे सुरूवातीला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनलाअपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करून तपास सुरु केला मात्र या दरम्यान हिरण यांचा मृतदेह सापडल्यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा लक्षवेधी ठरणार होता. गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक तसेच पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली माहिती घेत पुढील तपास श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग केला होता. त्यानंतर पोलिसांनी अत्यंत वेगात तपास करत यातील पाच मुख्य आरोपींना अटक केली. अजय राजू चव्हाण, नवनाथ धोंडू निकम, आकाश प्रकाश खाडे, संदीप मुरलीधर हiडे , जुनेद/जावेद बाबू शेख अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमिनि कार , पल्सर मोटरसायकल, हत्यार तपास कामी जप्त करण्यात आले. तपासादरम्यान एकूण २५ साक्षीदार तपासण्यात आले व एकूण ५०५ पानाचे सबळ पुराव्यासह पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी काल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान या हत्त्याकांडामुळे जिल्ह्यासह राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती. दिवसाढवळ्या एका व्यापाऱ्याचे अपहरण करून हत्त्या होते, यामुळे पोलिसांवर देखील चांगलाच दबाव होता. मात्र पोलिसांनी अत्यंत सखोल व तितकाच वेगाने तपास करून यातील सर्व आरोपी जेरबंद केले.

Back to top button