ग्रामविकास अधिकार्याला कार्यालयात घुसून मारहाण

अहमदनगर : एकाने दारुच्या नशेत घराचा उतारा मागण्याच्या कारणावरुन ग्रामविकास अधिकाऱ्यास कार्यालयात घुसून मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यातील निमगाव डाकु येथे घडला आहे. एम.एस.मानेअसे त्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे तर संजय मद्रास काळे असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. त्याने मारहाण केल्यानंतर थोड्याच वेळात त्याचा मुलगा व आई यांनी ग्रामपंचायत कार्यालयात घुसुन माने यांना मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे फाडले व सरकारी दप्तर अस्ताव्यस्त केले. कार्यालयात घुसुन दहशतीचे वातावरण निर्माण करत उपस्थित ग्रामस्थांनाही शिविगाळ केली.
आरोपीने कार्यालयातील फर्निचर अस्ताव्यस्त फेकून देत धिंगाणा घातला. मारहाण, शासकीय कामात अडथळा या प्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.