अहमदनगर

चोरट्याचा ७० हजारांवर डल्ला

अहमदनगर : घरामध्ये कपाटात ठेवलेल्या 70 हजार रूपयांवर चोरट्याने डल्ला मारला. सिव्हील हाडकोच्या शास्त्रीनगरमध्ये 30 मे ते 2 जून दरम्यान ही चोरीची घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. निकिता अनिल साळवे (वय 21 रा. सिव्हील हाडको) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या शास्त्रीनगरमधील घरातील कपाटात त्यांनी रोख 70 हजार रूपयाची रक्कम ठेवली होती. ती रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांच्या 2 मे रोजी लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार क्षीरसागर करीत आहे.

Back to top button