अहमदनगर

चोरीचा डंपर विकत घेणारा जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर : चोरीचा डंपर विकत घेणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जावेद बिबन सय्यद (वय 32 रा. शिंगवे नाईक ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सय्यद याच्याकडील सदरचा डंपर पोलिसांनी जप्त केला आहे. भिंगार येथील अजिंक्य पवार यांचा नगर- सोलापर रोडवरून डंपर चोरीला गेला होता. त्यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदर चोरीचा डंपर जावेद सय्यद याच्याकडे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यांनी त्यांचे एक पथक शिंगवे नाईक येथे पथक पाठवून जावेद याला ताब्यात घेत डंपर विषयी चौकशी केली असता सदरचा डंपर संदीप वाखुरे (रा. माळी बाभूळगाव ता. पाथर्डी) व गणेश जाधव (रा. पाथर्डी) यांच्याकडून विकत घेतला असल्याचे जावेद याने पोलिसांना सांगितले. वाखुरे व जाधव यांचा पोलिसांनी शोध घेतला असता ते मिळून आले नाही. निरीक्षक कटके यांच्या पथकातील सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी रवी सोनटक्के, शंकर चौधरी, रवींद्र घुंगासे, प्रकाश वाघ, मच्छिंद्र बर्डे, संदीप दरंदले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button