अहमदनगर

चोरी करणार्यासह चोरीचा माल विकत घेणारे तिघे जेरबंद

स्थानिका गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर : सावेडी उपनगरातील बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचे दुकान फोडणार्‍या व माल विकत घेणार्‍या आणखी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. करण लक्ष्मण माने (वय-22 रा. जामखेड), लक्ष्मण भिमराव कुर्‍हाडे (वय-30 रा. प्रेमदान हाडको, सावेडी), माल विकत घेणारा गणेश ऊर्फ गोपी रामपुकार महतो (वय 20 रा. गुलमोहर रोड, सावेडी) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. याच गुन्ह्यातील चौघांना यापूर्वी तोफखाना पोलिसांनी अटक केली होती.

सावेडी उपनगरातील पंचशील हॉटेल शेजारी असलेल्या महावीर सिरँमिक्स बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचे दुकान फोडून सहा लाख 48 हजार 800 रूपये किंमतीचे प्लंबिंग व बिल्डींगचे सामान अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी दुकानाचे मालक अरविंद अमृतलाल मुथ्या (रा. सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा करण माने याने केल्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्‍यामार्फत समजले. करण माने याचा शोध घेतला असता तो चाकण (जि. पुणे) येथे मिळून आला. त्याच्याकडून इतर आरोपींचे नावे समोर आली. यातील दोघांना अटक करत एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. आणखी आरोपी असल्याची शक्यत निरीक्षक कटके यांनी व्यक्त केली. सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, लक्ष्मण खोकले, कमलेश पाथरूट, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button