अहमदनगर

चौघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

मुळा एज्युकेशन सोसायटीमधील कर्मचारी प्रतिक बाळासाहेब काळे आत्महत्या प्रकरण

अहमदनगर (दि.1)- मुळा एज्युकेशन सोसायटीमधील कर्मचारी प्रतिक बाळासाहेब काळे (रा. तेलकुडगाव ता. नेवासा) यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी रविवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

महेश गोरक्षनाथ कदम, राहुल जनार्धन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी विनायक दामोदर देशमुख याला रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या चौघांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चौघांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतिक याने वरिष्ठ सहकार्‍यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेतला होता. मयत प्रतिक याची बहिण प्रतिक्षा हिच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश कदम, विनायक देशमुख, राहुल राजळे, व्यंकटेश बेल्हेकर, जगन्नाथ औटी, राऊसाहेब शेळके, रितेश टेमक यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल आहे. यातील देशमुख, कदम, राजळे, बेल्हेकर यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
औटी, शेळके आणि टेमक हे पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहे.

Back to top button