अहमदनगरमहाराष्ट्र

जिल्हयात मृत्यूचे तांडव ; तब्बल २२४ रुग्णांचा मृत्यू

आज ८६८ नवे करोना बाधित

अहमदनगर : जिल्ह्यात आज १ हजार १७१ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार ८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी मध्ये २४ तासात तब्बल २२४ रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर जिल्हयाच्या रूग्ण संख्येत  ८६८ नवे करोनाबाधीत आढळले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ५५४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये १०३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६४ आणि अँटीजेन चाचणीत ३०१ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले १०, जामखेड २, नगर ग्रामीण ४, कोपरगाव ४, नगर ग्रामीण ११, नेवासे १, पारनेर ४, पाथर्डी ९, राहता ३, राहुरी ४, संगमनेर २०, शेवगाव ७, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर १, कॅंटोन्मेंट बोर्ड ६ आणि मिलिटरी हॉस्पिटल १, अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०६, जामखेड ०२, कर्जत १६, कोपरगाव ३४, नगर ग्रामीण १६,  नेवासे ७०,  पारनेर ३८, पाथर्डी ६८, राहाता ०८,  राहुरी २२, संगमनेर १५, शेवगाव ६५, श्रीगोंदा ५६, श्रीरामपूर २१ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३०१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०९, अकोले ५२,  जामखेड ०७, कर्जत १७, कोपरगाव ३१, नगर ग्रा. १६, नेवासा ४०, पारनेर ३२, पाथर्डी १८,  राहाता ११, राहुरी १०, संगमनेर २०, शेवगाव ११, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ५१, अकोले ९५, जामखेड १२५, कर्जत ५६,  कोपरगाव ६०, नगर ग्रामीण ९५, नेवासा ७४, पारनेर ११२, पाथर्डी ८३, राहाता १३, राहुरी ५०, संगमनेर ११२,  शेवगाव ८८,  श्रीगोंदा ९७,  श्रीरामपूर ४२, कॅन्टोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०२, इतर जिल्हा १२ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज अखेर ३ हजार ७९५ जनांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मात्र, तब्बल २२४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. परंतु ही आकडेवारी आज पोर्टलला अपडेट केले असल्याने ही आकडेवारी जास्त दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Back to top button