अहमदनगर

जिल्हा परिषदेच्या “या” गटाच्या विकासासाठी ४ कोटी ७ लाख मंजूर

महासंदेश : जिल्हा परिषद लाडजळगाव गटामध्ये यावर्षी ४ कोटी ७ लाख ७५ हजार एवढा भरीव निधी जिल्हा परिषद मधून मंजूर झाला आहे. यामध्ये ठाकूर निमगाव व ठाकुर पिंपळगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामास मंजुरी मिळाली असून लवकरच गटामध्ये कामे सुरू करणार आहोत, अशी माहिती जिल्हा परिषद गटाच्या सदस्या हर्षदाताई काकडे यांनी दिली आहे.   जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, गेल्या वर्षापासून कोविड -१९ च्या साथीमुळे जिल्हा परिषदच्या निधीमध्ये कपात झाली होती. परंतु या वर्षी जिल्हा परिषद मधून ठाकुर पिंपळगाव व ठाकूर निमगाव येथे आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी प्रत्येकी ८८ लाख रुपये तर खरडगाव- ४, आधोडी – २, मंगरूळ खुर्द -२ व सुळेपिंपळगाव येथे १ शाळा खोली मंजूर करण्यात येऊन प्रत्येकी साठी ८ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच सालवडगाव ते मुर्शदपुर रस्त्यासाठी ३० लाख, अंतरवाली बु ते चापडगाव रस्त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंगरूळ बु येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयासाठी १० लाख, वरखेड येथे स्मशानभूमी बांधकामासाठी ५ लाख, श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान नागलवाडी येथे भक्तनिवास इमारतीसाठी १५ लाख, कोळगाव येथे साठवण बंधाऱ्यासाठी १५ लाख, लाडजळगाव येथील ढाकणे वस्तीवरील बंधाऱ्यासाठी १५ लाख, नागलवाडी बंधाऱ्यासाठी १५ लाख, कोळगाव येथील कोरडे वस्तीसाठी पाण्याची टाकी व वितरण व्यवस्थेसाठी २ लाख, हसणापूर येथे शिववस्तीवरील पाण्याची टाकी व वितरण व्यवस्थेसाठी २ लाख,  हायमॅक्स बसविण्यासाठी ९ लाख, माळेगाव ने गावअंतर्गत रस्ता दुरुस्ती करणेसाठी ४ लाख, खरडगाव झिरपे वस्ती रस्ता करण्यासाठी २ लाख, हसणापूर रस्ता दुरुस्तीसाठी ५० हजार तसेच शेकटे बु व शिंगोरी गोळेगाव आंबेडकर-नगर, गोळेगाव – इंदिरानगर खुल्या व्यायाम शाळेसाठी एकूण १४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आता कोविड -१९ आटोक्यात येत आहे. त्यामुळे लवकरच वरील कामांचा लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे, असे काकडे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Back to top button