अहमदनगर

जिल्हा रुग्णालय परिसरात वाहनाने घेतला पेट

अहमदनगर – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या शासकीय वाहनाने सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली. प्रसंगावधान दाखवत जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्‍यांनी प्रतिरोधक किटचा वापर करून आग नियंत्रणात आणली.

शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा हे दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील एक बैठक आटोपून शासकीय कारने जिल्हा रूग्णालयात आले होते. त्यानंतर काही वेळातच रूग्णालयाच्या दर्शनी भागात उभ्या केलेल्या शासकीय कारच्या बोनेट मधून धूर आणि आग दिसून आली. बघता-बघता कारच्या पुढील भागातुन आगीच्या ज्वाला भडकू लागल्या.
अचानक कारला आग लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. या दरम्यान रूग्णालयात असलेल्या फायर सेफ्टीने वायूचा मारा करत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले.

Back to top button