अहमदनगर

झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांचा छापा

अहमदनगर – शहरातील झेंडीगेट परिसरात असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तीन गोवंशीय जनावरांची सुटका केली.

याप्रकरणी रहिमोद्दीन कुरेशी (रा. झेंडीगेट) याच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1955 चे कलम 5 (ब), 9 (अ) 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार भारत इंगळे, सागर पालवे, योगेश भिंगारदिवे, इनामदार, हिवाळे, तानाजी पवार, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने झेंडीगेट पसिरातील बाबा बंगाली चौक या ठिकाणी बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई केली.

Back to top button