Travelअहमदनगरमहाराष्ट्र

ट्रक अडवून खून करणारे आरोपी 24 तासांत जेरबंद

ट्रक अडवून खून करणारे आरोपी 24 तासांत जेरबंद
लोणी पोलीस, स्थानिक गुन्हेशाखेची संयुक्त कारवाई
नगर, दि. 8 (प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावरील निर्मळ पिंपरी शिवारातील टोलनाक्याजवळ मध्यप्रदेशच्या दोन ट्रकचालकांना बेदम मारहाण करून एकाचा खून करणारे आरोपी लोणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांत जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी किरण राजू राशीनकर (वय 24, रा. भगवतीपूर कोल्हार), सोहेल नशीर शेख, (वय 19, रा. पिंजारगल्ली, कोल्हार), संतोष सुरेश पठारे, विशाल करचरू लोखंडे, अक्षय राजेंद्र शिंदे, संकेत किरण लोखंडे, रूपेश ज्ञानदेव चव्हाण, सागर सोमनाथ देशमाने यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
6 सप्टेंबरला रात्री सव्वाअकराच्या सुमारास निर्मळ पिंपरी शिवारात टोलनाक्याजवळ ही घटना घडली होती. भूपेंद्रसिंह बहादुरसिंह ठाकूर व कुलदीपसिंग तुंग हे दोघे मालट्रकमध्ये गहू भरून इंदूर येथून बंगळुरूच्या दिशेने जात असताना त्यांच्या ट्रकला निर्मळ पिंपरी शिवारातील टोलनाक्याजवळ 6 ते 7 जण आडवे आले. त्यानंतर या सात जणांच्या टोळीने तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्यांच्या साह्याने ठाकूर व तुंग यांना जबर मारहाण केली. यावेळी तुंग यांच्या मानेवर चाकू लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच चोरट्यांनी ट्रकचालकाकडील 300 रुपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपींना जेरबंद केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकातील नाना सूर्यवंशी, अशोक शिंदे, राजेंद्र औटी, दीपक पवार, शिशिरकुमार देशमुख, गणेश इंगळे, मनोहर गोसावी, विजय वेठेकर, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, अण्णा पवार, विशाल दळवी, राम माळी, संतोष लोंढे, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, योगेश सातपुते, रवींद्र घुगासे, संदीप दरंदले, प्रकाश वाघ, रणजित जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.

चौकट…
240 पोलीस अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित
करोनाचा संसर्ग शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील 240 पोलीस अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. त्यामध्ये 30 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 185 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी सांगीतले. तसेच 55 वर्षे वय असणार्‍या कर्मचार्‍यांना रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अर्वरित कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येत आहे, असेही ते म्हणाले.

55 Comments

  1. Howdy! I simply wish to give a huge thumbs up for the great information you have here on this post. I will be coming again to your weblog for extra soon.

  2. I’m so happy to read this. This is the type of manual that needs to be given and not the random misinformation that’s at the other blogs. Appreciate your sharing this best doc.

  3. I do believe your audience could very well want a good deal more stories like this carry on the excellent hard work.

  4. I have to say this post was certainly informative and contains useful content for enthusiastic visitors. I will definitely bookmark this website for future reference and further viewing. cheers a bunch for sharing this with us!

  5. বাংলা প্রশ্ন উত্তর সাইট তল্লাশি, আজই আপনার সমস্যা নিয়ে প্রশ্ন করুন , অভিজ্ঞ ব্যক্তিগন আপনার প্রশ্নের উত্তর দিয়ে সহযোগিতা করবে । তাছাড়াও অন্যাদের প্রশ্নের উত্তর দিয়ে, জিতে নিন আকর্ষণীয় পুরস্কার । তল্লাশিতে যেকোনো বিষয়ে প্রশ্ন করতে পারেন।।

  6. Thanks for some other great post. Where else may anybody get that kind of information in such an ideal method of writing? I’ve a presentation next week, and I am at the look for such information.

  7. I Am Going To have to come back again when my course load lets up – however I am taking your Rss feed so i can go through your site offline. Thanks.

  8. I think I will become a great follower.Just want to say your post is striking. The clarity in your post is simply striking and i can take for granted you are an expert on this subject.

  9. Hi there! I just wanted to ask if you ever have any trouble with hackers? My last blog (wordpress) was hacked and I ended up losing several weeks of hard work due to no back up. Do you have any solutions to protect against hackers?

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button