ठाकरे सरकारचा जावई शोध ; दारुबंदी उठवून गुन्हेगारी कमी होईल

चंद्रपूर दारूबंदीवर विरोधकांचा अत्यंत तिखट शब्दात हल्ला
महासंदेश : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेतल्याची बातमी समजताच जिल्ह्यातील तळीरामच नव्हे तर व्यापारी, मोठ-मोठे हॉटेलमालक, किरकोळ व्यावसायिक यांनी निर्णयाचे स्वागत केले. मात्र, दारूमुळे ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले व होत आहेत, अशा कुटुंबांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याने आता अवैध दारूविक्री आणि त्याअनुषंगाने फोफावणारी गुन्हेगारी याला आळा बसेल, अशी प्रतिक्रिया या निर्णयाचे स्वागत करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे, तर दारूबंदी समर्थकांनी निर्णयाचा विरोध करीत संताप व्यक्त केला आहे. दारूबंदी उठवण्याच्या निर्णयावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अत्यंत तिखट शब्दात हल्ला केला आहे. येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण हे सरकार मागे पुढे पहाणार नाही,’ अशी टीका भाजप आमदार राम सातपुते यांनी यांनी केली आहे.दारुबंदी उठवून गुन्हेगारी कमी होईल असा जावई शोध या ठाकरे सरकारने लावला आहे. येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला देखील हे सरकार मागे पुढे पहाणार नाही,’ असे ट्विट सातपुते यांनी केले आहे. तसेच त्यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर भाष्य करताना, अंधेर नगरी चौपट राजा असा उल्लेख केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे