अहमदनगरमहाराष्ट्र

ठेकेदारावर गोळीबार प्रकरणी चौघे अटक

खूनाचा बदला घेण्याचा इरादा
महासंदेश : वारजे परिसरात बांधकाम ठेकेदाराचा पाठलाग करुन गोळीबार केल्याचा थरार शनिवारी घडला होता. या घटनेतील चार आरोपींना खंडणी विरोधी पथकाने(1) अटक केली आहे. त्यांना ठेकेदाराला ठार मारायचे होते. मात्र त्याने गोळीबार चुकविल्याने तो बालंबाल बचावला होता. या घटनेनंतर शहरात खळबळ माजली होती.

रविंद्र सखाराम तागुंदे (36,रा.वारजे) असे बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अभिजीत तुकाराम येलवांडे ( रा. कर्वेनगर), नकुल श्‍याम खाडे, चेतन चंद्रकांत पवार, उमेश चिकणे यांना अटक केली आहे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलिस नाईक राजेंद्र लांडगे आणि नितीन रावळ यांना आरोपी अभिजीत येलवांडे हा गोसावी वस्ती येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याचेकडे तपास करता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी दीपक सोनवणे याचे खूनाच्या कारणावरून तागुंदे याला जीवे मारण्याच्या हेतूने गोळीबार केला. सोनवणे खून प्रकरणात तांगुदेवर गुन्हा दाखल होता. आरोपींवर वारजे पोलीस ठाण्यात अगोदर चार गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शना सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस नाईक नितीन कांबळे, नितीन रावळ, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण, विजय कांबळे यांच्या पथकाने केली.

Back to top button