अहमदनगर

तक्रार करूनही पोलिसांकडून आरोपींवर कारवाई होईना

महिलेने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे मागितली दाद

अहमदनगर : विनाकारण त्रास देणार्‍या आरोपीविरोधात दोनदा तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून आरोपींवर कारवाई होत नाही. त्यामुळे हे आरोपी आणखी त्रास देत असल्याची तक्रार बोल्हेगाव येथील दिव्यांग महिलेने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबत सरला नामदेव मोहोळकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी अपंग असून पती व दोन मुलींसोबत बोल्हेगाव येथे राहते. माझे पती व त्यांच्या भाऊबंदामध्ये वडिलोपार्जित मिळकतीवरून वाद आहे. त्याबाबत पतीने न्यायालयात दावा दाखल केला असून त्याचा राग मनात धरून छाया मोहळकर, संतोष मोहळकर, सोनाली बनकर, अक्षय मोहळकर यांनी मला व माझ्या पतीला मारहाण केली. याबाबत 16 जानेवारी व 21 मे असे दोनदा तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे आरोपींपासून जीवितास धोका आहे. तरी आरोपीविरोधात दि राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज अ‍ॅक्ट 2016 प्रमाणे कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

Back to top button