अहमदनगरमहाराष्ट्र

तरूणाकडून उकळले वीस लाख ; काय आहे हे प्रकरण

हनीट्रॅप प्रकरणातील ‘त्या’ तरूणीवर आणखी एक गुन्हा

महासंदेश : गतवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात तरूणाशी इंस्टाग्रामवरून ओळख करून त्याच्याशी शरीरसंबंध ठेवत इतर आरोपींच्या मदतीने त्याच्याकडून 20 लाख उकळल्याचे उघडकीस आले आहे.
समाजमाध्यमाव्दारे पुरूषांना जाळ्यांत ओढून त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत दाखल गुन्ह्यांतील तरूणीविरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातही आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणात पोलिसांनी तरूणीला अटक केली आहे. सहायक सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने तीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत एका 20 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 19 वर्षीय युवतीसह दहा आरोपींविरोधात लोणीकाळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button