महाराष्ट्र

…तर कठोर नियम पाळावेच लागतील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सातारकरांना उपदेश

महासंदेश : राज्यात सातारा जिल्हा करोना संक्रमणाच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी सातारकरांना कठोर नियम पाळावेच लागतील. त्यामुळे नागरीकांनी घरातच सुरक्षित राहावे, जे विनाकारण रस्त्यावर येतील त्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेतस सांगितले. तसेच विनाकारण पोलिसांना कारवाई करण्यासाठी कठोर व्हायला लावू नका, असे ही ते म्हणाले.

जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा व उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ”राज्यात 18 जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यात सातारा आघाडीवर आहे. त्यानुसार साताऱ्याला आलो आहे. वाढती संख्या रोखण्यावर काय उपाय करायचे यावर चर्चा झाली आहे. प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढला, निधी उपलब्ध केला आहे. तिसरी लाट आली तरी काय पावले उचलायची याबाबत सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेला 35 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव देणार आहे. राज्याने ज्या रूग्णवाहिकांची जी खरेदी केली आहे. त्यातील पाच रूग्णवाहिका तत्काळ येथील रुग्णसेवेत दाखल होणार आहेत. फलटण व माण तालुक्यात  करोना उपचारासाठी जंबो हॉस्पिटल होण्यासाठी सूचना केली आहे. त्यासाठी पाच दिवसात इ- टेंडर नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाठपुरावा करण्याचे आदेश पवार यांनी देत मनुष्यबळ आणि सुविधा देत आहोत त्यामुळे कामाचा रिझल्ट दिसलाच पाहिजे अन्यथा कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला .

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button