अहमदनगरमहाराष्ट्र

तलावात बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील निंबे येथे ११ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऊस तोडणी कामगाराचा हा मुलगा होता. साजन सावंत असे मयत मुलाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, पाटोदा तालुक्यातील काही ऊस तोडणी कामगार कर्जत तालुक्यातील निंबे येथे वास्तव्यास आहे. धुणे धुण्यासाठी भवानी माता तलावावर गेलेल्या आईसोबत हा मुलगा होता. त्या मुलाची आई कपडे धुण्यात व्यस्त असताना तिची नजर चुकवून हा मुलगा बाजूला गेला आणि तलावात बुडाला. काही वेळानंतर या दुर्घटनेची माहिती मिळाली. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button