महाराष्ट्र

तहसीलदाराच्या वाहनचालकाने घेतला गळफास !

महासंदेश  : तहसीलदारांच्या वाहनचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अरूण मधुकर दिक्षित (वय ५०, रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की  अरूण मधुकर दिक्षित हे पुणे शहराच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून काम करतात. गेल्या तीन-चार दिवसांपासून तब्येत ठिक नसल्यामुळे ते कामावर जात नव्हते. गुरूवारी दुपारी दिक्षित यांच्या पत्नीने त्यांना जेवण करण्यासाठी बोलवले. मात्र, दिक्षित घराच्या वरच्या खोलीत गेले. बराच वेळ होऊनही ते खाली न आल्याने कुटूंबियांनी दरवाजा वाजवून पाहिला. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडला असता दिक्षित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Back to top button