अहमदनगर

तालुक्याचे वाटोळे करणार्‍यांचा मार्केट कमिटीवर डोळा

शशिकांत गाडे यांची माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका
मांजरसुंबा येथे महाविकास आघाडीच्याप्रचाराचा केला प्रारंभ
नगर, दि.7 (प्रतिनिधी) – मागील 20 ते 25 वषार्ंच्या कालखंडात आम्ही राजकारणात सक्रिय असतांना आम्ही कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले नाही. मात्र, आता त्याला कारण ही तसेच असून, माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांनी व त्यांच्या सहकार्यांनी पै-पै गोळाकरून नगर तालुक्याच्या विकासाठी मार्केट कमिटी स्थापन केली. तसेच झोपडी कँन्टिनच्या परिसरात तालुका दूध संघ आणि जिल्हा दूध संघाची इमारत उभी केली. मात्र, काही विघ्न संतोषी लोकांनी दूध संघ बंद पाडून इमारत विकून नगर तालुक्याचे वाटोळे केले. आता मार्केट कमिटीवर त्यांचा डोळा असून ती विकण्याचा प्रयत्न आहे. हे रोखण्यासाठी नगर तालुक्यात महाविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले असून महाविकास आघाडील मतदान देवून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.
नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे महाविकास आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा  परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, गोविद मोकाटे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उध्दव दुसुंगे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत, शंकरराव कदम, अ‍ॅड. विजय कदम, डॉ. राम कदम, प्रशांत कदम, मलेश कदम, नानासाहेब कदम,एकनाथ कमद, भाऊसाहेब कदम, सुर्यभान कदम, दादू वाघमारे, दत्तू कदम, देविदास कदम, विश्‍वास कदम, अंकुश कदम, सागर वाघमारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गाडे पुढे म्हणाले, महाविकास आघाडीने आज शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्याचे काम केले आहे. नगर जिल्ह्याला 1 हजार 350 कोटी कर्ज शेतकर्‍यांचे माफ केले. जिल्हा बँक व मार्केट कमिटी ताब्यात घेण्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून खेळत्या भांडवला चे वाटप केले. हे कर्ज मार्च अखेर भरावे लागणार आहे. त्यासाठी दहा ते बारा टक्क्यांनी पैसे शेतकर्‍याना भरावे लागणार आहे. तसेच नगर तालुक्याची कामधेनु असणारी बाजार समिती ची दहा एकर जागा विकण्याचा डाव कर्डिलेंचा आहे. दूध संघ कवडी मोलाच्या भावाने विकला आता बाजार समितीच्या जागेवर कर्डिले यांचा डोळा आहे. तसेच या निवडणुकीत मतदारा ना आता फोन येणार आहे. संकटकाळात कर्ज वाटप केले आता भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या. मतदारांनी ही त्यांना सांगावे 15 तारखेच्या आत कर्ज स्वरूपात वाटप केलेले खेळते भांडवल माफ करा आम्ही तुमच्या बरोबर आहे, असे सांगा.
शेळके म्हणाले नगर तालुक्याची अपप्रवृत्तीच्या लोकांना त्याची जागा दाखवण्यासाठी एकत्र आलो आहे. तालुक्यातील सेस्था हडप करण्याचा याचा धंदा आता बंद करणार आहोत. तालुक्यातील अपप्रवृत्ती हटवणार आहोत यासाठी महा आघाडी च्या उमेदवारांना विजयी करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button