महाराष्ट्र

‘तो’ आदेश रद्द न झाल्याने पाणी बचाव संघर्ष समिती आक्रमक

महासंदेश : उजनी धरनातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याबाबतचा अध्यादेश रद्द करण्यात न आल्याने उजनी धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. तर काही ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे रस्त्यावर टायर पेटवून शासनाचा निषेध करण्यात आला.

उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्द झाला आहे, असे सांगण्यात येत होते. याबाबतचा जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. गेले आठवडा भर याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताच अध्यादेश न निघाल्याने आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका उडाला आहे.

 इदापूर तालुक्यातील २२ गावे १९७१ सालापासून पाण्यासाठी झगडत आहेत. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्या शेतकऱ्यांसाठी निरा डाव्या कालव्यातून आणि खडकवासला धरणातून पाण्याची तरतूद करून ऊस लावण्याची परवानगी दिली होती. मग आता ५० वर्षानंतरदेखील इंदापूरचे ते शेतकरी पाण्यासाठी का झगडत आहेत? त्यांच्यासाठी राखीव ठेवलेले पाणी गेले कुठे?, असा सवाल संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी उपस्थित केला आहे. यात इंदापूर व सोलापूरकरांचे भांडण लावण्याचे काम बारामतीकरांनी केले असून याची किंमत त्यांना येणाऱ्या काळात मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button