अहमदनगर

‘तो’ घराच्या ओढीने गावाकडे निघाला मात्र…?

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील एका हॉटेलवर कामाला असणारा वेटर गावाकडे जाण्यासाठी निघाला. मात्र नगर-औरंगाबाद रोडवरील झापवाडी शिवारात भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. राजेश सिंह सकरवार असे त्या मृत इसमाचे नाव आहे.याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हॉटेलवर कामाला असणारा वेटर राजेश सिंह सकरवार (रा. वार्ड नंबर ६, दुर्गा मंदिर जवळील लालबग छिंदवाडा, मध्यप्रदेश)हा त्याचे मूळ गावी जाण्यासाठी पायी घोडेगावकडे जात असताना त्यास नगर औरंगाबाद रोडवरील  पेट्रोलपंपा जवळील हॉटेल शिवशाही समोर  ट्रक क्रमांक (MH 20 EL 8661) वरील चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवत  राजेशसिंह सकरवार यास पाठीमागून जोराची धडक दिली. यात तो जबर जखमी झाला मात्र त्याला कोणतीही मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विजय एकनाथ पवार  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकच्या चालकावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button