अहमदनगरमहाराष्ट्र

‘त्यांचे’ काम महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत पाहतोय !

अहमदनगर : लोकप्रतिनिधी कसा असावा, एक भाऊ, एक अधिकाराचा, हक्काचा माणूस कसा असावा हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलेआहे. अडचणीच्या काळात ज्या पद्धतीने आ.नीलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम केले आहे हे महाराष्ट्र  नव्हे तर संपूर्ण भारत पाहतोय’. ज्या कोरोनाला पाहून लोक घराच्या बाहेर पडत नाहीत, अनेकजण बाधित कुटूंबाला सोडून पळून जात होते. अनेकांचा तर अंत्यविधी करायलाही कोणी येत नव्हते. असे असताना आमदार नीलेश लंके यांनी जे काम केले आहे त्याला माझा मानाचा मुजरा ! असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त खा. सुळे यांनी दुरसंवाद प्रणालीद्वारे भाळवणी येथील कोवीड सेंटर मधील रूग्णांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, लंके यांनी केलेले काम भारताला अभिमान वाटावा असे आहे. कोरोनापासून संपूर्ण जग पळून जात होतं त्यावेळी आगीत उडी मारण्यासारखे  काम लंके यांनी केलं आहे. या कोव्हिड सेंटरमधील रूग्ण पांडूरंग आहेत. या पांडूरंगांची केलेली सेवा खूप कौतुकास्पद आहे. इथे आ. लंके यांनी खूप प्रेम आणि आशिर्वाद मिळाले आहेत ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. गेल्या काही दिवसांत एक आदर्श लोकप्रतिनिधी, एक आदर्श भाऊ, आदर्श मुलाच्या रूपाने आ. लंके यांनी काम केले आहे. त्याची नोंद पारनेरने घेतली, जिल्हयाने घेतली, राज्याने व देशानेही घेतली असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.
     मराठी, हिंदी, इंग्रजी या वृत्तवाहिन्यांवर आ. लंके यांचे काम दाखविण्यात आले. पत्रकारही वेडे झाले आहेत, कोण आहे नीलेश लंके अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नमुद करून यावेळी बोलताना खा. सुळे पुढे म्हणाल्या, एक कोव्हिड केअर सेंटर कसे असावे असे नियोजनबद्ध काम त्यांनी केले आहे. एमबीए ची डीग्री घेतली की मॅनेजमेंट समजतं. नीलेश लंके यांनी जे करून दाखवलंय ते व्यवस्थापन हॉवर्ड, सिंबॉयसिस, एमआयटीला जाऊन शिकावं लागत नाही. एखाद्या माणसाने ठरविले तर डिग्री नसली तरीही तो किती सुंदर मॅनेजमेंट करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

Back to top button