अहमदनगरमहाराष्ट्र

‘त्या’ जागेवर आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लावा !

अहमदनगर : खंडणी वसूलीच्या आरोपावरुन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद कमी झाले आहे.  या रिकाम्या झालेल्या जागेवर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लावावी. अशी मागणी करत नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी तसा ठराव देखील मांडला आहे. या ठरावात आ.जगताप यांनी मंत्रीपदाची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी एक ठराव मांडण्यात आला. त्यात संग्राम जगताप यांची मंत्रिपदी वर्णी लावावी अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जगताप म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना ४ विधानसभा सदस्यामागे १ मंत्रीपद असा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ६ विधानसभा सदस्य असूनही प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पद मिळाले. हा अहमदनगर जिल्ह्यावर झालेला राजकीय अन्याय आहे. त्यामुळे जगताप यांना मंत्री पद देण्याची मागणी होऊ लागली आहे.  

Back to top button