त्या’ निराधार झालेल्या महिलांना ‘या’ आमदाराचा’आधार’..!
अहमदनगर : कोरोनामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्याने निराधार झालेल्या महिलांना आता आमदार रोहित पवार यांनी आधार दिला आहे. या कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या ‘आधार’ या उपक्रमाद्वारे सोडवणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलांना स्वयंरोजगार सहाय्य, प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कोरोनामुळे अनेकांच्या घरातील कमवत्या व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेकजण आज निराधार झाले आहेत. यात प्रामुख्याने निराधार झालेल्या महिलांना घरबसल्या रोजगार देऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे. याकरिता या महिलांना शिलाई मशीन व पीठ गिरणी किंवा इतर छोटा घरगुती उद्योग मिळाल्यास त्यांची रोजगाराची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. तसेच महिला स्वावलंबी होऊन सक्षमीकरणाचा उद्देश साध्य होईल, या दृष्टीकोनातून ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.