अहमदनगरमहाराष्ट्र

‘त्या’ रुग्णालयातील चक्क ‘एका’ उपकरणाचा अहवाल पॉजिटीव्ह !

अहमदनगर : आतापर्यंत आपण मानव प्राण्याला कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे ऐकले व पहिले आहे. कोरोनाबाधितांवर  रुग्णालयात उपचार केले जातात. मात्र जर रुग्णालयातील एखादे  उपकरणच पॉजिटीव्ह असेल तर..! होय अशी घटना घडली आहे आणि ती देखील आपल्या जवळ असलेल्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात.  

सध्या राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असतानाच आता लहान मुलांना कोरोनाची बाधा होत आहे.
त्यामुळे एखाद्याला साधी सर्दी झाली, खोकला जाणवला तरीदेखील कोरोनाचा संशय व्यक्त केला जातो. मग त्या व्यक्तीला कोरोना झाला की नाही, याचे  निदान करण्यासाठी संशयित रुग्णाच्या विविध टेस्ट केल्या जातात.  मात्र, रूग्णालयातील जर एखाद्या उपकरणालाच कोरोना झाला तर? म्हणून औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात खबरदारी म्हणून विविध ६०  ठिकाणांहून उपकरणांचे नमुने गोळा करत कोरोना चाचणी करण्यात आली.

या तपासणीत एका मॉनिटरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मॉनिटरच्या सरफेसवर कोरोनाचा विषाणू आढळून आला. आता रुग्णालयातील वॉर्ड, आयसीयू आणि रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांची कोरोना चाचणीद्वारे तपासणी केली जात आहे. रुग्णांना उपचारादरम्यान खोकला, शिंकेचा त्रास असतो. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना वॉर्डातील वेगवेगळ्या वैद्यकीय उपकरणांवर, फरशीवर कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती असते.
यापूर्वी ऑपरेशन थिएटरचं वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत होतं. एखादा कोरोना रुग्ण आला तर ओटी बंद करून निर्जंतुकीरण, तपासणी केली जाते. आता अशीच खबरदारी अगदी वॉर्ड, आयसीयूच्या बाबतीत घेतली आहे.

Back to top button