अहमदनगर

“त्या” शिक्षिकेची आत्महत्या

नगर तालुक्यातील इमापूर येथे आढळला होता विहिरीत मृत देह

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर परिसरात विहिरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आज सकाळी आढळून आला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र ती महिला कोण असावी, तसेच तिने आत्महत्या केली की तिचा खून झाला याबाबत एक चर्चा या परिसरात सुरु होती. याबाबत पोलिसांनी ‘त्या’ मृत महिलेची ओळख पटविली असून वंदना रेपाळे (रा. पाइपलाइन) असल्याचे पोलिसांनी सांगीतले असून त्या धनगरवाडी येथे शिक्षिका होत्या.

वंदना रेपाळे या गेल्या चार दिवसापासून मिसिंग होत्या. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांनी आत्महत्या केली असल्याची सुसाईट नोट ही त्यांच्या पर्स मध्ये सापडली आहे. त्यात म्हटले आहे की, मला मणक्याचा त्रास असल्याने आत्महत्या केली आहे, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

याबात अधिक माहिती अशी की, नगर-औरंगाबाद महामार्गावर सुनील पांडुरंग टीमकरे हे आपल्या शेतात मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे दुर्गंधी आल्याने त्यांनी वेळी डोकावले असता पाण्यात तरंगताना महिलेचा मृतदेह दिसला त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांशी संपर्ककरून  सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

Back to top button