अहमदनगर

दरोड्याच्या तयारीत असलेले सहाजण जेरबंद

कोतवाली पोलिसांची कामगिरी

अहमदनगर : केडगाव परिसरातील नगर पुणे रोडवरील हॉटेल सचिन जवळ कुठेतरी दारोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या जणांची टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकल, लोखंडी सत्तुर,गज व मिरची पुड असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मानगावकर यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, केडगाव परिसरातील केडगाव परिसरातील नगर पुणे रोडवरील हॉटेल सचिन लगत काहीजण कोठेतरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारी करत असल्याची माहिती दिली. या अनुषंगाने यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक भंगाळे यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोतवालीच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला असता यावेळी पोलिसांनी सोनू उर्फ रुपेश सुधाकर भालेराव (रा.पंचशिल नगर रेल्वे स्टेशन अ.नगर) , अनुज सुधाकर उजागरे (रा.ताराबाग कॉलनी, केडगाव अहमदनगर), रोहन सतीश शिंदे (रा.पंचशील नगर रेल्वे स्टेशन अहमदनगर), कुणाल सुधाकर भालेराव (रा.पंचशिल नगर) यांच्यासह इतर दोन अल्पवयीन असे सहाजण ताब्यात घेतले. त्यांची त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक काळा रंगाची सुझुकी कंपनीची ॲक्सेस मोपेड (क्रमांक एमएच १६ बी डब्ल्यू ८५५६), एक धारदार सत्तुर, आणखी काळ्या रंगाची सुझुकी कंपनीची ॲक्सेस मोपेड गाडी (क्र.एमएच १६ सीआर ९९७९) एक लोखंडी गज व मिरची पूड असा मुद्देमाल आढळून आला. या सर्वांना ताब्यात घेतले असून याबाबत पुढील तपास सपोनि रणदिवे हे करत आहेत.

Back to top button