अहमदनगर

दहशतीसाठी पिस्तूल बाळगले ; अन झाले असे काही….

महासंदेश : नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गावठी पिस्तूलासह जिवंत काडतुसे बाळगणार्या दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केले. मयूर भाउसाहेब गायकवाड (वय २५, रा. चिखली जाधववाडी ) आणि ओंकार उर्पâ विकी प्रकाश नाळे (वय २८ रा. इंद्रायणीनगर, भोसरी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही आरोपी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत सराईत आहेत.

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूलासह काडतुसे बाळगणारे सराईत वाघोलीतील सुयोगनगरमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस नाईक नितीन मुंढे आणि नितीन शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नागरिकांमध्ये दहशत राहण्याच्या हेतूने पिस्तूल व काडतुसे बाळगल्याची कबुली दिली.

दोघेही आरोपी मनोज साळवे टोळीतील आहेत. त्यांच्याविरूद्ध लोणीवंâद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय नरेंद्र पाटील, मच्छ्रिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांनी केली.

Back to top button