क्रीडा

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांची कोरोनावर मात

महासंदेश : भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोनावर मात केली. आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु त्यांना अद्यापही ऑक्सिजनची गरज भासत आहे. ९१ वर्षीय मिल्खा सिंग यांनी प्रकृती सुधारली होती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आले. त्यांची प्रकृती स्थीर आहे. ते अजूनही ऑक्सिजन व न्यूट्रीशनच्या सपोर्टवर आहेत.

 त्यांच्या पत्नीला मात्र आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे,”असे फोर्टीज हॉस्पिटलनं सांगितले. मिल्खा सिंग यांनी कोरोनावर मात केल्याचे हॉस्पिटलने आधीच सांगितले होते. सोमवारी मिल्खा सिंग यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बुधवारी त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाल्याचे समोर आले आणि त्यांनाही उपचार्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मिल्खा सिंग यांचा मुलगा व गोल्फपटू जीव शनिवारी दुबईहून चंडिगढ येथे दाखल झाला. त्यांची मुलगी मोना मिल्खा सिंग या अमेरिकेत डॉक्टर आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्याची भारतात दाखल झाल्या. मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्णपदकं जिंकली आहेत.

Back to top button